हार्दिक अभिनंदन!
कु. सरिता ताराचंद खोटेले रा. गिरोला यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून महसूल विभागात लेखनिक या पदासाठी निवड मिळवली आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या अथक प्रयत्नांना आणि चिकाटीला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा!-
- ग्रामपंचायत गिरोला
हार्दिक अभिनंदन!
श्री.रोहित घनश्याम ठाकरे रा. ईसनाटोला यांनी कठोर परिश्रम व चिकाटीच्या जोरावर भारतीय नौदलात भरती होण्याचा मान मिळविला आहे, ही आपल्या गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा!
- ग्रामपंचायत गिरोला
हार्दिक अभिनंदन!
श्री. अरविंद बाहेकर, रा. गिरोला यांनी आपली मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर भारत-तिबेट सीमा पोलीस दलात (ITBP) भरती होण्याचा मान मिळविला आहे, ही आपल्या गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा!
- ग्रामपंचायत गिरोला